-: दिनविशेष :-

३ जानेवारी


महत्त्वाच्या घटना:

२००४

नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

१९५७

हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

१९५०

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

१९४७

अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९२५

बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.

१४९६

लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३१

य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक
(मृत्यू: ११ जानेवारी २००८)

१९२१

चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
(मृत्यू: ६ जुलै १९९७)

१८८३

क्लेमंट अ‍ॅटली
हॅरी ट्रूमन आणि जोसेफ स्टॅलिन यांच्या समवेत
पॉट्सडॅम परिषद (१९४५)

क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

(Image Credit: Wikipedia)

१८५३

कृष्णाजी नारायण आठल्ये – ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, ‘केरळ कोकिळ’ या मासिकाचे संस्थापक व संपादक
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९२६)

१८३१

सावित्रीबाई फुले – समाजसेविका
(मृत्यू: १० मार्च १८९७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५

ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
(जन्म: ८ जानेवारी १९३५)

२००२

१९२०

प्रा. सतीश धवन

प्रा. सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९७१), पद्मविभूषण (१९८१)
(जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

(Image Credit: Wikipedia)

२०००

डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ‘महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
(जन्म: २६ डिसेंबर १९१४)

१९९८

प्रा. केशव विष्णू तथा ‘बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य
(जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

१९९४

अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक
(जन्म: ? ? ????)

१९७५

बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजुनही उलगडलेले नाही.
(जन्म: २ फेब्रुवारी १९२३)

१९०३

अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील
(जन्म: ७ जून १८३७)



Pageviews

This page was last modified on 07 October 2021 at 11:49pm