-: दिनविशेष :-

४ जानेवारी

आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

ब्रम्हदेश (म्यानमार) चा मुक्तिदिन


महत्त्वाच्या घटना:

२०१०

बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.

१९९६

साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ‘बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

१९५९

लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले. २ जानेवारी रोजी हे यान प्रक्षेपित करण्यात आले होते.

१९५८

१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.

१९५४

मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५२

ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.

१९४८

ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४४

१० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.

१९३२

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा

१९२६

क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.

१८८५

आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.

१८८१

लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ‘केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.

१६४१

कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४१

कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते
(मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ – नवी दिल्ली)

१९३१

निरुपा रॉय
अमर अकबर अँथनी (१९७७)

कोकिळा किशोरचंद्र बलसारा तथा निरुपा रॉय – चित्रपट अभिनेत्री. त्यांनी सुमारे २५० हुन अधिक चित्रपटात भूमिका केल्या. नायकाच्या आईची भूमिका अनेकदा त्यांच्या वाट्याला येत असे.
(मृत्यू: १३ ऑक्टोबर २००४)

(Image Credit:  Movies N Memories)

१९२५

प्रदीप कुमार

प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता
(मृत्यू: २७ आक्टोबर २००१)

(Image Credit:  Film History Pics)

१९२४

विद्याधर गोखले – नाटककार व संपादक
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)

१९१४

इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका
(मृत्यू: १३ जुलै २०००)

१८१३

सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक
(मृत्यू: १२ जानेवारी १८९७)

१८०९

लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक
(मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४

राहूलदेव बर्मन तथा ‘पंचमदा’ – संगीतकार
(जन्म: २७ जून १९३९)

१९६५

टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: २६ सप्टेंबर १८८८)

१९६१

आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १२ ऑगस्ट १८८७)

१९०८

राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
(जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ - कशेळी, राजापूर, रत्‍नागिरी)

१९०७

गोवर्धनराम त्रिपाठी

गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ‘सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.
(जन्म: २० आक्टोबर १८५५ - नडियाद, गुजराथ)

(Image Credit: Collector Bazar)

१७५२

गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती
(जन्म: ३१ जुलै १७०४)



Pageviews

This page was last modified on 30 April 2022 at 10:57pm