-: दिनविशेष :-

५ जानेवारी


महत्त्वाच्या घटना:

२००४

‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या समाजसेवकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान झाले. समाजसेवकांनी अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ जाळण्यात व फाडण्यात आले.

१९९८

ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ‘महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

१९९७

रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९७४

अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५° सेल्सिअस) नोंद

१९५७

भारतात विक्रीकर कायदा सुरू झाला.

१९४८

जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ‘वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला. ‘रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धांवर हा माहितीपट होता.

१९३३

सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

१९१९

द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

१६७१

मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.

१६६४

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६

दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार

१९५५

ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री

१९४८

फैय्याज – अभिनेत्री व गायिका

१९४८

मन्सूर अली खान पतौडी

मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान, पतौडी संस्थानचे ९ वे आणि शेवटचे नबाब (१९५२ - १९७१). अर्जुन अवॉर्ड (१९६४), पद्मश्री (१९६७)
(मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

(Image Credit: ESPN CricInfo)

१९४८

पार्थसारथी शर्मा

पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू
(मृत्यू: २० ऑक्टोबर २०१०)

(Image Credit: Cricket Country)

१९२८

झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान
(मृत्यू: ४ एप्रिल १९७९)

१९२२

मुक्री

मोहम्मद उमर ‘मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते
(मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

(Image Credit:  Movies N Memories)

१९०९

श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार
(मृत्यू: २४ मार्च २००७)

१८९२

कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ
(मृत्यू: १२ जून १९६४ - मुंबई)

१८५५

किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक
(मृत्यू: ९ जुलै १९३२)

१५९२

शहाजहान – ५ वा मुघल सम्राट
(मृत्यू: २२ जानेवारी १६६६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००३

गोपालदास पानसे – पखवाजवादक
(जन्म: ? ? ????)

१९९२

दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
(जन्म: ३ जुलै १९१४)

१९९०

रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)

१९८२

सी. रामचंद्र – संगीतकार
(जन्म: १२ जानेवारी १९१८)

१९६१

नारायण धोंडोपंत तथा ना. धों. ताम्हनकर – लेखक
(जन्म: ३१ ऑगस्ट १८९३)

१९४३

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ
(जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

१९३३

काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ४ जुलै १८७२)



Pageviews

This page was last modified on 18 October 2021 at 11:48pm