-: दिनविशेष :-

११ जानेवारी


महत्त्वाच्या घटना:

२००१

सॅम पिरोज तथा एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: १ नोव्हेंबर २००१ ते ५ मे २००२)

२०००

??

छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना

(Image Credit: High Court Of Chhattisgarh)

१९९९

‘कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी

१९८०

बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

१९७२

पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

१९६६

पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आकस्मिक निधनामुळे गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून (दुसऱ्यांदा) कार्यभार स्वीकारला.

१९४२

दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले

१९२२

मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

१७८७

टिटानिया
व्हॉयेजर-२ अंतराळयानाने घेतलेले टिटानियाच्या दक्षिण गोलार्धाचे छायाचित्र

विल्यम हर्षेल याने ‘टिटानिया‘ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ‘ओबेरॉन‘ या युरेनसच्या दुसर्‍या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.

(Image Credit: Wikipedia)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५५

आशा खाडिलकर

आशा खाडिलकर – ख्याल, भजन, ठुमरी, तराणा, बंदिश आणि नाट्यसंगीत गायिका

(Image Credit: Wikipedia)

१९४४

शिबू सोरेन

शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री (हे एकूण ३ वेळा मुख्यमंत्री झाले),केंद्रीय कोळसा मंत्री, लोकसभा खासदार (दुमका मतदारसंघ) आणि राज्यसभा खासदार. २८ नोव्हेंबर २००६ रोजी हत्या आणि अपहरण प्रकरणात यांना १२ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली.

(Image Credit: Wikipedia)

१८५९

लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय
(मृत्यू: २० मार्च १९२५)

१८५८

श्रीधर पाठक

श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
(मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)

(Image Credit: Bharat Discovery)

१८१५

जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान
(मृत्यू: ६ जून १८९१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८

य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक
(जन्म: ३ जानेवारी १९३१)

२००८

सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक
(जन्म: २० जुलै १९१९)

१९९७

भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
(जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

१९८३

घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी
(जन्म: १० एप्रिल १८९४)

१९६६

स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
(जन्म: २ आक्टोबर १९०४)

१९५४

सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ‘सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
(जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

१९२८

थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी
(जन्म: २ जून १८४०)



Pageviews

This page was last modified on 11 September 2021 at 10:14pm