-: दिनविशेष :-

२१ जानेवारी

  तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिरात पेशवे काळात देवीच्या नैवेद्याच्या नावाखाली प्रसाद म्हणून मद्यप्राशन करण्याचा प्रघात होता. हा प्रघात एवढा लोकप्रिय झाला की त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पेशव्यांना नैवेद्याची ही आगळीवेगळी पद्धत बंद करण्यासाठी विशेष प्रयत्‍न करावे लागले!


महत्त्वाच्या घटना:

२०००

‘फायर अँड फरगेट‘ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

१९७२

मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.

१९६१

इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट

१८०५

होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

१७९३

राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

१७६१

थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३

पॉल अ‍ॅलन – मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक

१९२४

प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ
(मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)

१९१०

शांताराम आठवले

शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार. ‘भाग्यरेखा’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ‘संत तुकाराम’ चित्रपटातील ‘आधी बीज एकले’ हा अभंग त्यांनी रचला आहे. परंतु लोकांना हा अभंग तुकारामांचाच आहे असे वाटते.
(मृत्यू : २ मे १९७५)

(Image Credit: shantaramathavale.com)

१८९४

माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ‘माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)

१८८२

वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक
(मृत्यू: २० जुलै १९४३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८

सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख
(जन्म: २१ जून १९१६)

१९६५

हरिकीर्तन कौर ऊर्फ ‘गीता बाली’ – अभिनेत्री
(जन्म: ? ? १९३०)

१९५९

सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक
(जन्म: १२ ऑगस्ट १८८१)

१९५०

एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार
(जन्म: २५ जून १९०३)

१९४५

रास बिहारी घोष
१९६७ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

रास बिहारी घोष – क्रांतिकारक. १९४२ मध्ये टोकियो येथे त्यांनी घेतलेल्या एका परिषदेत ‘इंडियन इंडिपेडन्स लीग’ ची स्थापना केली. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र दल उभारण्याची गरज आहे अशी त्यांची भूमिका होती. यातूनच पुढे ‘इंडियन नॅशनल आर्मी’ उदयास आली.
(जन्म: २५ मे १८८६ - सुबलदाहा, पूर्व बर्धमान, पश्चिम बंगाल)

१९४३

क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
(जन्म: २३ मार्च १९२३)

१९२४

ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक
(जन्म: २२ एप्रिल १८७०)

१९०१

एलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक
(जन्म: २ ऑगस्ट १८३५)

१७९३

लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: २३ ऑगस्ट १७५४)



Pageviews

This page was last modified on 27 August 2021 at 11:50pm