-: दिनविशेष :-

३ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

१९६६

सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

१९२८

‘सायमन गो बॅक’ या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.

१९२५

भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

१८७०

अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६३

रघुराम राजन

रघुराम राजन – भारत सरकारचे १५ वे प्रमुख आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे २३ वे नियामक (Governor), आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ (Chief Economist), शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक

(Image Credit: Wikipedia)

१९००

थिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)

१८२१

डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर
(मृत्यू: ३१ मे १९१०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९६९

सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री
(जन्म: १५ सप्टेंबर १९०९)

१९२४

वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पारितोषिक (१९१९) विजेते
(जन्म: २८ डिसेंबर १८५६)

१८३२

पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.
(जन्म: ७ सप्टेंबर १७९१)



Pageviews

This page was last modified on 30 May 2021 at 11:45pm