-: दिनविशेष :-

२१ फेब्रुवारी

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (UNESCO)


महत्त्वाच्या घटना:

१९७५

जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला!

१९२५

द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९१५

लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.

१८७८

न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.

१८४८

कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ‘द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.

१८४२

जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७०

मायकेल स्लॅटर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९४२

जयश्री गडकर

जयश्री गडकर – अभिनेत्री
(मृत्यू: २९ ऑगस्ट २००८ - मुंबई)

(Image Credit: Filmi Beat)

१९११

भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
(मृत्यू: ११ जानेवारी १९९७)

१८९६

सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी ४४ ग्रंथ लिहिले. कन्येच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या ‘सरोजस्मृती’ या शोकगीताची हिन्दीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांमध्ये गणना होते.
(मृत्यू: १५ आक्टोबर १९६१)

१८९४

डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक
(मृत्यू: १ जानेवारी १९५५)

१८७५

जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला
(मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८

ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ‘ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
(जन्म: १९ डिसेंबर १९१९)

१९९१

नूतन समर्थ (बहल) – चित्रपट अभिनेत्री
(जन्म: ४ जून १९३६)

१९७७

रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत
(जन्म: १५ मे १९०३)

१९७५

गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक
(जन्म: १८ सप्टेंबर १९१२)

१९६५

‘माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते
(जन्म: १९ मे १९२५)

१८२९

राणी चन्नम्मा
बेळगावी टाऊन हॉल जवळील अश्वारूढ पुतळा

चन्नम्मा – कित्तूरची राणी
(जन्म: २३ आक्टोबर १७७८)

(Image Credit: Suma)



Pageviews

This page was last modified on 22 October 2021 at 11:09pm