-: दिनविशेष :-

५ मे

जागतिक हास्य दिन

आंतरराष्ट्रीय सुईण दिन

International Midwives' Day

पूर्वी खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्याचे तंत्र माहित नसल्याने अनेक अडचणी येत असत. विशेषत: युद्धावरील सैनिकांचे बरेच हाल होत. हे लक्षात घेऊन सम्राट नेपोलियनने अन्न टिकवण्याचे तंत्र शोधून काढण्यासाठी तब्बल बारा हजार फ्रँकचे बक्षीसच जाहीर केले. त्यातूनच या शोधाला चालना मिळून हवाबंद डब्यात खाद्य पदार्थ साठविण्याचा शोध लागला.

महत्त्वाच्या घटना:

२०२१

ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुखमंत्रीपदाची शपथ घेतली. सलग तीनदा मुख्यमंत्री होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

(Image Credit: The Indian Express)

१९९९

दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

१९९७

जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

१९६१

एलन शेफर्ड
मर्क्युरी-३ कॅप्सूलमध्ये शेफर्ड

कमांडर एलन शेफर्ड हा अंतराळयात्रा करणारा पहिला अमेरिकन बनला. रेडस्टोन रॉकेटला जोडलेल्या मर्क्युरी - ३ या कॅप्सूलमधून त्याने हा प्रवास केला. रशियाच्या युरी गागारिनने अंतराळयात्रा करणारा पहिला मानव बनण्याचा विक्रम केल्यानंतर ३ आठवड्यांनी शेफर्ड अंतराळप्रवासी झाला. १५ मिनिटाच्या या प्रवासात तो पृथ्वीपासून १८४ किमी उंच गेला होता.

(Image Credit: bbc.co.uk)

१९५०

भूमिबोल अदुल्यतेज यांचा थायलंडचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.

१९५५

Flag of West Germany

पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व प्राप्त झाले.

(Image Credit: विकिपीडिया)

१९३६

इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.

१९०१

पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

१२६०

कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१६

ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री
(मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

१८१८

कार्ल मार्क्स
१८७५ मधील छायाचित्र

कार्ल हाईनरिच मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, क्रान्तिकारक आणि कम्युनिझमचे प्रणेते
(मृत्यू: १४ मार्च १८८३)

१४७९

गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू
(मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)

(Image Credit: विकिपीडिया)

८६७

उडा – जपानी सम्राट
(मृत्यू: १९ जुलै ९३१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००६

नौशाद अली – संगीतकार
(जन्म: २५ डिसेंबर १९१९)

२०००

वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ
(जन्म: ? ? ????)

१९८९

नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, रतन टाटा यांचे वडील, पद्मभूषण [१९६९]
(जन्म: ३० ऑगस्ट १९०४ - मुंबई)

१९४३

गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे – ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होती. बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत.

(जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)

१९१८

त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ‘बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले.
(जन्म: १३ ऑगस्ट १८९०)

१८२१

फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन
(जन्म: १५ ऑगस्ट १७६९)



Pageviews

This page was last modified on 31 May 2021 at 8:06pm