-: दिनविशेष :-

११ मे

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफ हिने जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील १,००० वा सामना खेळण्याचा एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला.

१९९८

२४ वर्षांनंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्या परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह तीन यशस्वी आण्विक चाचण्या केल्या.

१९६०

अ‍ॅडॉल्फ आइकमन
१९४२ मधील छायाचित्र

लाखो ज्यूंची कत्तल करून खोट्या कागपत्रांच्या आधारे १९४८ मध्ये अर्जेंटिनात पळून गेलेल्या लेफ्टनंट कर्नल अ‍ॅडॉल्फ आइकमन याला मोसाद या इस्रायलच्या गुप्तहेर संघटनेने अर्जेंटिनातील ब्युनॉसआयर्स येथे पकडले. पुढे २० मे १९६० रोजी त्याला इस्रायलला हलवण्यात आले. आणि त्याच्यावर रीतसर खटला चालवून १ जून १९६२ रोजी त्याला फासावर चढवण्यात आले.

(Image Credit: Wikipedia)

आइकमन बद्दल थोडक्यात अधिक माहिती देणारा हा BBC Marathi चा व्हिडीओ बघा (०९:५३):

१९४९

इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला.

१८८८

मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी ‘महात्मा’ ही पदवी दिली.

१८६७

लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.

१८५८

मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले.

१८५७

राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.

१८११

चँग आणि एंग
डावीकडचा एंग आणि उजवीकडचा चँग

चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. या दोघांचेही लग्न होऊन त्यांना एकूण २१ अपत्ये झाली (चँग १० आणि एंग ११)!
(मृत्यू: १७ जानेवारी १८७४)

(Image Credit: Wikipedia)

१५०२

ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५०

सदाशिव दत्तात्रय अमरापूरकर – मराठी व हिंदी चित्रपटांतील अभिनेते. १९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या २२ जून १८९७ या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०१४)

सदाशिव अमरापूरकर

(Image Credit:  @FilmHistoryPic)

१९१९

सुमती गुप्ते

सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार आणि रसरंग दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्यांनी १९४० मध्ये संत ज्ञानेश्वर या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकले. भालजी पेंढारकर यांच्या ‘थोरातांची कमळा’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. राजा परांजपे यांच्या ‘ऊन पाऊस’ या चित्रपटात त्यांनी एका वृद्ध महिलेची भूमिका केली होती. या भूमिकेचे आजही प्रचंड कौतुक होते. संत ज्ञानेश्वर (१९४०), थोरातांची कमळा (१९४१), माझे बाळ (१९४३), शरबती आँखे (१९४५), संतान (१९४६), वीर घटोत्कच (१९४९), नंद किशोर (१९५१), शिव लीला (१९५२), श्यामची आई (१९५३), ऊन पाऊस (१९५४), समाज (१९५४), शेवग्याच्या शेंगा (१९५५), कारिगर (१९५८), मौसी (१९५८), कीचक वध (१९५९), वक्त (१९६५), सज्जो रानी (१९७६), हरे काच की चुडिया (१९६७), परिवार (१९६८), प्रार्थना (१९६९), अधिकार (१९७१), जलते बदन (१९७३), पेसै की गुडिया (१९७४), आदमी सडक का (१९७७), फासी का फंदा (१९८६), पवनाकाठचा धोंडी, शेवटचा मालूसरा, कुंकवाचा करंडा, दाम करी काम हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयाबरोबरच ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ आणि ‘शेवटचा मालुसरा’ या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. मराठी चित्रपटांप्रमाणेच ‘लग्नाची  बेडी’, ‘घराबाहेर’, ‘संशयकल्लोळ’ इत्यादी नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
(मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००९)

(Image Credit: Bytes of India)

१९१८

रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक. २९ डिसेंबर १९५९ रोजी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या कॅलटेक (Caltech) येथे दिलेल्या There's Plenty of Room at the Bottom या भाषणात आजच्या अब्जांश तंत्रज्ञानाची (Nanotechnology ) बीजे रोवली गेली आहेत असे मानता येईल.
(मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८)

१९१४

ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(मृत्यू: ५ ऑगस्ट २००१)

१९०४

साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात.
(मृत्यू: २३ जानेवारी १९८९)

१८९५

जिद्दू कृष्णमूर्ती तथा जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ, वक्ते आणि लेखक
(मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४

कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक
(जन्म: २७ मे १९१३)

१८८९

जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ‘कॅडबरी’ चे संस्थापक
(जन्म: १२ ऑगस्ट १८०१)

१८७१

सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक
(जन्म: ७ मार्च १७९२)



Pageviews

This page was last modified on 02 June 2021 at 3:15pm