-: दिनविशेष :-

४ जून

आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन

International Day of Innocent Children Victims of Aggression

महत्त्वाच्या घटना:

२००१

१ जून २००१ रोजी राजवाड्यात झालेल्या हत्यासत्रानंतर नेपाळचे राजे ग्यानेंद्र गादीवर बसले.

१९९७

‘इन्सॅट-२डी’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेन्च गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

१९९४

गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.

१९९४

वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ८ डावांत ७ शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९३

आय. एन. एस. म्हैसुर या युद्धविनाशकेचे जलावतरण

१९७९

घानामधे लष्करी उठाव

१९७०

टोंगाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९४४

दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी रोम जिंकले.

१८९६

हेन्‍री फोर्डने तयार केलेल्या पहिल्या स्वयंचलित वाहनाचे (Quadricycle) रस्त्यावर यशस्वी परीक्षण करण्यात आले. याला ४ हॉर्सपॉवरचे इंजिन आणि २ गिअर्स होते. या वाहनाला रिव्हर्स गिअर नव्हता.

१६७४

राज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकीलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७५

अँजेलिना जोली

अँजेलिना जोली – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती आणि मानवतावादी कार्यकर्ती, ऑस्कर पारितोषिक प्रमुख अभिनेत्री (२००९), ऑस्कर पारितोषिक सहाय्यक अभिनेत्री (२०००)

(Image Credit: IMDb)

१९४७

अशोक सराफ

अशोक सराफ – विनोदी अभिनेता

(Image Credit: Cinestaan)

१९४६

एस. पी. बालसुब्रम्हण्यम

श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक. पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११) व पद्मविभूषण (२०२१ - मरणोत्तर)
(मृत्यू: २५ सप्टेंबर २०२०)

(Image Credit: The Indian Express)

१९३६

नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)

१७३८

जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९४७

पंडित धर्मानंद कोसंबी

पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषा तज्ञ
(जन्म: ९ आक्टोबर १८७६ - सांखवल, गोवा)

(Image Credit: Wikipedia)

१९४२

राईनहार्ड हायड्रीच या अत्यंत क्रूर नाझी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. तो इतका क्रूर होता, की खुद्द हिटलरने सुद्धा त्याचे वर्णन ‘The man with the iron heart’ असे केले होते.
(जन्म: ७ मार्च १९०४)



Pageviews

This page was last modified on 08 October 2021 at 11:27pm