-: दिनविशेष :-

३० जून


महत्त्वाच्या घटना:

१९९७

ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

१९८६

केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

१९७८

अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

१९७१

सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

१९६६

कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९६५

भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

१९६०

काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४४

मुंबईच्या ‘सेंट्रल’ सिनेमात ‘प्रभात’चा ‘रामशास्त्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटापासून ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९

सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू

१९६६

माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा

१९४३

सईद अख्तर मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९२८

कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ‘कल्याणजी-आनंदजी‘ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू
(मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)

१४७०

चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: ७ एप्रिल १४९८)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९

कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी
(जन्म: ? ? ????)

१९९७

राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.

१९९४

बाळ कोल्हटकर

बाळकृष्ण हरी तथा ‘बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक
(जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

(Image Credit: Indian Film History)

१९९२

डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक
(जन्म: ? ? ????)

१९१७

दादाभाई नौरोजी
२०१७ मध्ये जरी केलेले टपाल तिकीट

पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय
(जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 25 September 2021 at 9:29am