-: दिनविशेष :-

११ जुलै

जागतिक लोकसंख्या दिन

झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेकारी, रोगराई असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. अशा प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) म्हणून साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

२००६

मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

२००१

आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

१९९४

दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

१९७९

अमेरिकेची ‘स्कायलॅब’ ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

१९७१

चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९५५

अमेरिकेने आपल्या चलनावर ‘In God we trust’ (देवावर आमचा विश्वास आहे)असे छापण्याचे ठरवले.

१९५०

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.

१९३०

ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.

१९०८

लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.

१८९३

कोकिची मिकीमोटो यांनी पहिला ‘कल्चर्ड’ मोती मिळवला.

१८०१

फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ‘पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.

१६५९

अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरुन निघून प्रतापगड येथे पोचले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३

सुरेश प्रभू – केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री

१९२१

शंकरराव खरात

शंकरराव रामचंद्र खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: ९ एप्रिल २००१)

(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)

१८९१

परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत.
(मृत्यू: २८ मे १९६१)

१८८९

नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ‘सुखाचा मूलमंत्र’, ‘पहाटेपुर्वीचा काळोख’, ‘उमज पडेल तर’, ‘एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ‘कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता.
(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ - कोरेगाव, जिल्हा सातारा)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९

शांताराम नांदगावकर

शांताराम नांदगावकर – गीतकार व कवी, विधानपरिषद सदस्य (शिवसेना - १९८५)
(जन्म: १९ आक्टोबर १९३६ - नांदगाव, सिंधुदूर्ग)

(Image Credit: Indian Film History)

२००३

सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक
(जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

१९९४

रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ‘परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा सन्मान मिळवणारे ‘बॉम्बे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते.
(जन्म: ? ? ????)

१९८९

सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता
(जन्म: २२ मे १९०७)



Pageviews

This page was last modified on 17 October 2021 at 9:21pm