-: दिनविशेष :-

२२ जुलै


महत्त्वाच्या घटना:

२००१

जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मातब्बर जलतरणपटू इयान थॉर्प याने आपला पहिला विश्वविक्रम केला. त्याने ४०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३ मिनिटे ४०.१७ सेकंद अशा विक्रमी वेळात जिंकली.

१९९३

वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स’ या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले. या सदस्यांना प्रतिष्ठेच्या ‘ऑस्कर’ पुरस्काराबाबत मत देण्याचा अधिकार आहे.

१९७७

चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.

१९४४

पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.

१९४२

वॉर्सा मधुन ज्यू लोकांना हद्दपार करणे सुरू झाले.

१९३३

विली पोस्ट या वैमानिकाने एकटयाने ७ दिवस १८ तास व ४९ मिनिटे या विक्रमी वेळात विमानातून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

१९३१

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. त्यात हॉटसन वाचला. पुढे हे ‘हॉटसन’ गोगटे पुण्याचे महापौर बनले.

१९०८

‘देशाचे दुर्दैव’ हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३७

वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
(मृत्यू: २२ डिसेंबर २०११)

१९२५

गोविंद तळवलकर – पत्रकार (२७ वर्षे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक) व लेखक
(मृत्यू: २१ मार्च २०१७)

१९२३

मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश’ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेला ‘दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती.
(मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६)

१८९८

पं. विनायकराव पटवर्धन – शास्त्रीय गायक
(मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००३

उदय हुसेन – इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचा मुलगा
(जन्म: १८ जून १९६५)

२००३

कुसय हुसेन – इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचा मुलगा
(जन्म: १७ मे १९६६)

१९९५

हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: १४ नोव्हेंबर १९०४)

१९८४

गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ – ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र कादंबरीकार आणि ४०० हून अधिक ग्रंथांचे प्रकाशक
(जन्म: २६ मे १९०९)

१९१८

इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट
(जन्म: २ डिसेंबर १८९८)



Pageviews

This page was last modified on 03 June 2021 at 2:22pm