-: दिनविशेष :-

५ ऑगस्ट


महत्त्वाच्या घटना:

२०१६

ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात

१९९७

रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ‘सोयूझ-यू’ हे अंतराळयान ‘मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना

१९९७

फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर

१९९४

इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ‘होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान

१९६५

पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

१९६२

नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर सुमारे २७ वर्षांनी म्हणजे ११ फेब्रुवारी १९९० या दिवशी त्यांची सुटका झाली.

१९६२

कन्या नक्षत्रात पहिल्या ‘क्‍वासार’ तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश

१८६१

अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७५

काजोल – अभिनेत्री

१९७२

अकिब जावेद – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज

१९६९

वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज

१९३३

विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा

१९३०

नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव
(मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

१८९०

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी
(मृत्यू: ६ आक्टोबर १९७९)

१८५८

वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी
(मृत्यू: ११ जून १९२४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

ज्योत्स्‍ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(जन्म: ११ मे १९१४)

२०००

लाला अमरनाथ

नानिक अमरनाथ भारद्वाज तथा लाला अमरनाथ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर
(जन्म: ११ सप्टेंबर १९११ - कपूरथाला, पंजाब)

(Image Credit: ESPN CricInfo / WISDEN)

१९९७

के. पी. आर. गोपालन – स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते
(जन्म: ? ? ????)

१९९२

अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते
(जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)

१९८४

रिचर्ड बर्टन – अभिनेता
(जन्म: १० नोव्हेंबर १९२५)

१९६२

मेरिलीन मन्‍रो

अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्‍रो यांनी गोळी झाडुन घेऊन आत्महत्या केली.
(जन्म: १ जून १९२६)

(Image Credit: Pexels)

८८२

लुई (तिसरा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: ? ? ८६३)



Pageviews

This page was last modified on 09 September 2021 at 3:29pm