हा या वर्षातील २४० वा (लीप वर्षातील २४१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९० : इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
१९३७ : ’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.
१९३१ : फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
१९१६ : पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९१६ : पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८४५ : सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६६ : प्रिया दत्त – लोकसभा खासदार?
१९३४ : सुजाता मनोहर – सर्वोच्‍च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
१९२८ : उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४)
१९१८ : राम कदम – संगीतकार (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९०८ : विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार (मृत्यू: ? ? ????)
१९०६ : नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू: ? ? १९९१)
१८९६ : रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२)
१७४९ : योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी (मृत्यू: २२ मार्च १८३२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१ : व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी (जन्म: ६ जुलै १९२७)
१६६७ : मिर्झा राजे जयसिंग (जन्म: १५ जुलै १६११)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 5 March, 2014 13:44