-: दिनविशेष :-

२७ सप्टेंबर

राष्ट्रीय ग्रंथालय दिन

जागतिक पर्यटन दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९६

मोहम्मद नजीबुल्लाह
मोहम्मद नजीबुल्लाह (१९९१)

तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.

(Image Credit: Wikipedia)

१९६१

सिएरा लिओनचा ध्वज

सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

(Image Credit: Wikipedia)

१९५८

मिहीर सेन

मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला. पद्मश्री (१९५९), पद्मभूषण (१९६७)

(Image Credit: webindia123.com)

१९४०

दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.

१९२५

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

१९०५

अल्बर्ट आईन्स्टाईन
E = mc2

हे वस्तुमान ऊर्जा समतुल्यता दाखवणारे समीकरण अल्बर्ट आईन्स्टाईन याने ‘Annalen der Physik’ या नियतकालिकात प्रकाशित केले.

(Image Credit:  @PhysInHistory)

१८२१

मेक्सिकोचा ध्वज

मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

(Image Credit: Wikipedia)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

Embed from Getty Images

लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू

१९८१

Embed from Getty Images

ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९६२

Embed from Getty Images

गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९५३

माता अमृतानंदमयी

सुधामणी इदामन्नेल तथा माता अमृतानंदमयी

(Image Credit:  @Amritanandamayi)

१९३२

यश चोप्रा
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते
(मृत्यू: २१ आक्टोबर २०१२ - मुंबई)

(Image Credit: Wikipedia)

१९१७

नयना देवी

निलीना सेन तथा नयना देवी – रामपूर-सहसवान आणि बनारस घराण्याच्या ठुमरी, दादरा व गझल गायिका, पद्मश्री (१९७४)
(मृत्यू: १ नोव्हेंबर १९९३)

(Image Credit: My Words & Thoughts)

१९०७

वामनराव देशपांडे

वामनराव हरी देशपांडे – संगीत समीक्षक
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९०)

१६०१

लुई (तेरावा)

लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा
(कार्यकाल: १४ मे १६१० ते १४ मे १६४३)
(मृत्यू: १४ मे १६४३)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८

महेन्द्र कपूर

महेन्द्र कपूर – पार्श्वगायक, पद्मश्री (१९७२). आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २५,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.
(जन्म: ९ जानेवारी १९३४ - अमृतसर

(Image Credit: Wikipedia)

२००४

शोभा गुर्टू

भानुमती शिरोडकर तथा शोभा गुर्टू – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, ठुमरी गायनासाठी त्या विख्यात होत्या. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मभूषण (२००२)
(जन्म: ८ फेब्रुवारी १९२५ - बेळगावी, कर्नाटक)

(Image Credit: Rekhta)

१९९९

डॉ. मेबल आरोळे – बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या
(जन्म: २६ डिसेंबर १९३५)

१९९२

अनुताई वाघ – समाजसेविका
(जन्म: १७ मार्च १९१०)

१९७५

तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ३ फेब्रुवारी १९००)

१९७२

एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
(जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

१९२९

शिवराम महादेव परांजपे – ‘काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार
(जन्म: २७ जून १८६४)

१८३३

राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.
(जन्म: २२ मे १७७२)

१७२९

मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत. [वैशाख व. १४, शके १६५१]
(जन्म: ? ? १६६५)



Pageviews

This page was last modified on 31 October 2021 at 10:21pm