-: दिनविशेष :-

६ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

२०१२

बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

२००१

संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे ‘धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

१९९९

विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर

१९९६

‘अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ‘जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

१९१३

दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२६

झिग झिगलर
२००९ मधील छायाचित्र

हिलरी हिंटन तथा ‘झिग’ झिगलर – अमेरिकन लेखक
(मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)

(Image Credit: Wikipedia)

१९१५

दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
(मृत्यू: २१ मार्च २००५)

१९०१

श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक
(मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

१८९०

बळवंत गणेश खापर्डे – कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र
(मृत्यू: ? ? ????)

१८७१

विनायक लक्ष्मण भावे – मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार आणि ‘महाराष्ट्र सारस्वत’ या मराठी साहित्येतिहास ग्रंथाचे लेखक. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले सारे आयुष्य ‘महाराष्ट्र कवी’ नावाच्या मासिकासाठी अर्पण केले. या मासिकाने सलग चार वर्षे रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजविताना अनेक ग्रामीण व होतकरू कविंच्या व लेखकांच्या, उजेडात न आलेल्या कवितांना व इतर कलाकृतींना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.१८९३ मध्ये त्यांनी ठाणे येथे मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना केली. साहित्य व इतिहासाव्यतिरीक्त निसर्गातील प्राणी, पक्षी, किटक यांवर अतिशय उपयुक्त टिपणवजा माहिती त्यांनी संग्रहित करून ठेवलेली आहे.
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९२६ - पुणे)

१८३९

भगवादास इंद्रजी – प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ
(मृत्यू: ? ? ????)

१८१४

अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक
(मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८

अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक
(जन्म: १९ सप्टेंबर १९१७)

१९९२

‘गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार – गायक व नट
(जन्म: ६ डिसेंबर १९१६)

१९९१

प्रा. रामचंद्र भिकाजी तथा रा. भि. जोशी – साहित्यिक, प्रवासवर्णन, कथा, अनुवाद, व्यक्तिचित्रे असे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. वाटचाल, घाटशिळेवरि उभी या त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्यकृती आहेत.
(जन्म: १० जुलै १९०३ - हैदराबाद)

१९८७

भालबा केळकर

प्रा. भालचंद्र वामन तथा ‘भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते, ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’ या नाट्यसंस्थेचे एक संस्थापक
(जन्म: २३ सप्टेंबर १९२०)

(Image Credit: दैनिक प्रहार)

१९८५

हरी जरीवाला ऊर्फ ‘संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते
(जन्म: ९ जुलै १९३८)

१८३६

चार्ल्स (दहावा)
फ्रँकॉईस गेरॉर्ड याने काढलेले प्रतिमाचित्र

चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: ९ आक्टोबर १७५७)

(Image Credit: Wikipedia)

१७६१

औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्‍कर देताना मराठेशाही वाचवणार्‍या महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील ४ थ्या छत्रपती) यांचे निधन
(जन्म: ? ? १६७५)



Pageviews

This page was last modified on 27 November 2021 at 6:06pm