-: दिनविशेष :-

२३ नोव्हेंबर

संस्कृती एकता दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ‘अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान

१९७१

चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

१९५५

कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

१९२४

एडविन हबल यांनी ‘देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८४

अमृता खानविलकर – अभिनेत्री

१९६७

गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक

१९३०

गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका
(मृत्यू: २० जुलै १९७२)

१९२६

सत्यनारायण राजू ऊर्फ ‘सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू
(मृत्यू: २४ एप्रिल २०११)

१९२३

नागनाथ संतराम तथा ‘ना. सं.’ इनामदार – लेखक. शहेनशहा, राऊ, झुंज, राजेश्री, शिकस्त, मंत्रावेगळा, झेप इ. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या खूप गाजल्या आहेत.
(मृत्यू: १६ आक्टोबर २००२)

१९१६

शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री (कुंकू, दुनिया ना माने, अमृत मंथन इ.)
(मृत्यू: २५ फेब्रुवारी १९६४)

१८९७

निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ‘अ‍ॅन आटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या.
(मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ - लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

१८८२

वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती
(मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

१७५५

थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक
(मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२०

तरुण गोगोई – केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्य मंत्री (१९९३ ते १९९५), लोकसभा खासदार (५ वेळा - जोरहाट व कालीबोर मतदारसंघ), आसामचे १३ वे मुख्यमंत्री
[कार्यकाल: १८ मे २००१ ते २४ मे २०१६]
(जन्म: १ एप्रिल १९३६)

२०००

बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक
(जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

१९९९

कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
(जन्म: ? ? ????)

१९९३

ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
(जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

१९५९

‘नटवर्य‘ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते
(जन्म: १२ मार्च १८९१)

१९३७

जगदीशचंद्र बोस
१९१५ मधील छायाचित्र

जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
(जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)

(Image Credit: Bose Institute)



Pageviews

This page was last modified on 15 October 2021 at 9:05pm