-: दिनविशेष :-

१ डिसेंबर

जागतिक एडस प्रतिबंध दिन

एन. सी. सी. दिन


महत्त्वाच्या घटना:

२००१

ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.

१९९९

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ‘वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.

१९९३

प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय ‘डी. लिट.’ पदवी जाहीर

१९९२

कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर

१९९२

ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.

१९८८

बेनझीर भूट्टो यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नेमणूक झाली.

१९८१

AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

१९७६

अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९७३

पापुआ न्यू गिनीला (ऑस्ट्रेलियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६५

सीमा सुरक्षा बल

भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना

(Image Credit: Wikipedia)

१९६४

मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९६३

नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.

१९४८

एस. एस. आपटे यांनी ‘हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

१९१७

कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८०

मोहम्मद कैफ – भारतीय क्रिकेटपटू

१९६३

अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक

१९५५

उदित नारायण – पार्श्वगायक

१९११

अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक
(मृत्यू: ४ आक्टोबर १९६६)

१९०९

बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
(मृत्यू: २० मार्च १९५६)

१८८५

आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ‘काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ - १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ - संनिधि आश्रम, नवी दिल्ली)

१७६१

मेरी तूसाँ – ‘मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका
(मृत्यू: १६ एप्रिल १८५०)

१०८१

लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९०

विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी
(जन्म: १८ ऑगस्ट १९००)

१९८८

गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.’ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०)
(जन्म: २ आक्टोबर १९०८)

१९८५

शंकर त्रिंबक तथा ‘दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
(जन्म: १८ जून १८९९)

१८६६

भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट
(जन्म: ४ जुलै १७९०)

११३५

हेन्‍री (पहिला) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ? ? १०६८)



Pageviews

This page was last modified on 01 December 2021 at 9:19pm