-: दिनविशेष :-

९ जानेवारी

प्रवासी भारतीय दिवस


महत्त्वाच्या घटना:

२००१

नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.

२००१

नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

१९१५

महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन

१८८०

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची (काळे पाणी) शिक्षा झाली. त्यांची रवानगी एडन येथील तुरुंगात करण्यात आली. तुरुंगातच त्यांचे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी निधन झाले.

१७८८

कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.

१७६०

बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६५

फराह खान – नृत्यदिग्दर्शक

१९५१

पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य

१९३८

चक्रवर्ती रामानुजम

चक्रवर्ती रामानुजम – अंकशास्त्र आणि बैजिक भूमिती या क्षेत्रांत संशोधन केलेले भारतीय गणिती (श्रीनिवास रामानुजन नव्हे)
(मृत्यू: २७ आक्टोबर १९७४)

(Image Credit: indiaonline.in)

१९३४

+ महेंद्र कपूर

महेंद्र कपूर – पार्श्वगायक, पद्मश्री (१९७२). आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी २५,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.
(मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ - मुंबई)

(Image Credit: Rekhta)

१९२७

सुंदरलाल बहुगुणा

सुंदरलाल बहुगुणा – चिपको आंदोलनाचे प्रणेते व ‘The Sentry of the Himalayas’ म्हणून ओळखले जाणारे पर्यावरणरक्षक
(मृत्यू: २१ मे २०२१ - ऋषिकेश)

(Image Credit:  Twitter)

१९२६

अनुप कुमार

कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते व चित्रकार
(मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ - मुंबई)

(Image Credit: Wikipedia)

१९२२

हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

१९१३

रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३

जेम्स बुकॅनन

जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते (१९८६) अमेरिकन अर्थतज्ञ
(जन्म: ३ आक्टोबर १९१९)

(Image Credit: The New York Times)

२००४

शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक
(जन्म: ? ? १९११)

२००३

ओम प्रकाश भंडारी उर्फ क़मर जलालाबादी – गीतकार व कवी
(जन्म: ९ मार्च १९१७ - अमृतसर)

१९२३

सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)
(जन्म: १ जून १८४२)

१८४८

कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत.
(जन्म: १६ मार्च १७५०)Pageviews

This page was last modified on 26 October 2021 at 11:32pm