सरोदवादक अमजद अली खान यांना ‘गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ‘अप्सरा पुरस्कार’ जाहीर
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास
हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ‘अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.
एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू
(मृत्यू: २६ जून २००५)
बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ‘शशी कपूर’ – अभिनेता
(मृत्यू: ४ डिसेंबर४ डिसेंबर २०१७)
एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष
(मृत्यू: १ एप्रिल २०१२)
इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)
मालती बेडेकर ऊर्फ ‘विभावरी शिरुरकर’ – लेखिका
(मृत्यू: ७ मे २००१)
कृष्णाजी भास्कर तथा ‘तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक
(मृत्यू: ? ? ????)
वामन गोपाळ तथा ‘वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ‘राष्ट्रमत’ आणि ‘स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक व नाटककार. त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध
आहेत.
(मृत्यू: ३ जून १९५६)
नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)
महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली.
(मृत्यू: १ जून १९४४)
रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक
(मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)
शहाजी राजे भोसले (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)