वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत (सध्याची उंची ५०६ मीटर) वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. यामुळे २५ वर्षे चालू असलेला न्यायालयातील वाद संपुष्टात आला.
(Image Credit: विकिपीडिया)
श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध ‘नेचर’ मासिकात प्रकाशित झाला.
(Image Credit: genome.gov)
स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
१९३.३ किमी लांबीच्या सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
अल्फ्रेड जेम्स तथा ‘अल’ पचिनो – हॉलिवूडमधील अभिनेता
(Image Credit: विकिपीडिया)
शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली
(मृत्यू: ११ मार्च १९९३)
गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचा शोध लावणारे इटालियन संशोधक. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९०९) विजेते.
(मृत्यू: २० जुलै १९३७)
(Image Credit: The Nobel Prize)
लुई (नववा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)
पं. राजन मिश्रा – ‘राजन-साजन’ मिश्रा या बनारस घराण्याच्या ख्याल गायक द्वयीतील राजन मिश्रा यांचे दिल्लीत कोविड-१९ मुळे निधन
(जन्म: ? ? १९५१)
(Image Credit: विकिपीडिया)
लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.
(जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)
इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका
(जन्म: १२ मे १८९९)
पंढरीनाथ रेगे – साहित्यिक, बाल / कुमार कथा लेखक. मनमोहक गोष्टी, मनोहर कथा, इटुकल्यांसाठी रामायण, समुद्र-समंध, चातुर्याची झटापट, ५१ गमतीदार गोष्टी, कासवाची चतुराई, इंद्रधनुष्य, धनगराची मुलगी ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके
आहेत.
(जन्म: ? ? ????)