१ जून २००१ रोजी राजवाड्यात झालेल्या हत्यासत्रानंतर नेपाळचे राजे ग्यानेंद्र गादीवर बसले.
‘इन्सॅट-२डी’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेन्च गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.
वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ८ डावांत ७ शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
आय. एन. एस. म्हैसुर या युद्धविनाशकेचे जलावतरण
घानामधे लष्करी उठाव
टोंगाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी रोम जिंकले.
हेन्री फोर्डने तयार केलेल्या पहिल्या स्वयंचलित वाहनाचे (Quadricycle) रस्त्यावर यशस्वी परीक्षण करण्यात आले. याला ४ हॉर्सपॉवरचे इंजिन आणि २ गिअर्स होते. या वाहनाला रिव्हर्स गिअर नव्हता.
राज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकीलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
अँजेलिना जोली – अमेरिकन अभिनेत्री, निर्माती आणि मानवतावादी कार्यकर्ती, ऑस्कर पारितोषिक प्रमुख अभिनेत्री (२००९), ऑस्कर पारितोषिक सहाय्यक अभिनेत्री (२०००)
(Image Credit: IMDb)
श्रीपती पंडिताराध्युला तथा एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक. पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०११) व पद्मविभूषण (२०२१ - मरणोत्तर)
(मृत्यू: २५ सप्टेंबर २०२०)
(Image Credit: The Indian Express)
नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: २९ जानेवारी १८२०)
राईनहार्ड हायड्रीच या अत्यंत क्रूर नाझी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. तो इतका क्रूर होता, की खुद्द हिटलरने सुद्धा त्याचे वर्णन ‘The man with the iron heart’ असे केले होते.
(जन्म: ७ मार्च १९०४)