-: दिनविशेष :-

७ जून


महत्त्वाच्या घटना:

२००६

अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

२००४

शिरोमणी अकाली दल (लोंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

२००१

युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेअरच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत

१९९४

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती. या पदावर प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

१९७९

रशियातील कापुस्तिन यार येथुन ‘भास्कर-१’ या दुसर्‍या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१९७५

क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमधे सुरूवात झाली.

१९६५

परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने कायदेशीर ठरवले.

१८९३

महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

अ‍ॅना कुर्निकोव्हा

अ‍ॅना कुर्निकोव्हा – रशियन लॉन टेनिस खेळाडू

(Image Credit: superwags.com)

१९७४

महेश भूपती – भारतीय लॉन टेनिस खेळाडू

१९४२

मुअम्मर गडाफी
सत्ता हस्तगत केल्यानंतर (१९७०)

मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा
(मृत्यू: २० आक्टोबर २०११)

(Image Credit: Wikipedia)

१९२७

निर्मलादेवी
गाली (१९४४)

निर्मलादेवी – पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री. बॉम्बे सिनेटोन या कंपनीतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीस सुरुवात केली. सवेरा (१९४२), कानून (१९४३), गाली (१९४४), चालीस करोड (१९४६), अनमोल रतन (१९५०), चक्रम (१९६८), सती अनसूया (१९७४) हे त्यांचे काही चित्रपट आहेत. सवेरा, कानून, शमा परवाना, बावर्ची, राम तेरी गंगा मैली इत्यादी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा हा त्यांचा मुलगा आहे.
(मृत्यू: १५ जून १९९६)

(Image Credit:  @Cinemaazi)

१९१७

डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
(मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

१९१४

ख्वाजा अहमद ऊर्फ के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार
(मृत्यू: १ जून १९८७)

१९१३

मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार
(मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

१८३७

अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील
(मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

बी. डी. जत्ती
रणबीर सक्सेना यांनी काढलेले प्रतिमाचित्र

बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. सुमारे पाच महिने (११ फेब्रुवारी १९७७ ते २५ जुलै १९७७) ते हंगामी राष्ट्रपती होते.
(जन्म: १० सप्टेंबर १९१२)

(Image Credit: राज्यसभा)

२०००

गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ‘आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ‘बालोद्यान’ कार्यक्रमातील ‘नाना’
(जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

१९९२

डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ‘तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ‘महात्मा फुले समग्र वाङ्‍मय’ संपादित केले आहे.
(जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

१९७०

इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक
(जन्म: १ जानेवारी १८७९)

१९५४

अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ
(जन्म: २३ जून १९१२)Pageviews

This page was last modified on 18 October 2021 at 11:17pm