तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.
अभिनेत्री व नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना ‘भरतनाट्य शिखरमणी’ पुरस्कार जाहीर
विश्वकप फूटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने इटालीला पेनल्टी शूटआऊटमधे हरवले.
तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगू थल्ली’ हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान
कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे २१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
वॉल्ट डिस्ने यांनी अॅनाहेम, कॅलिफोर्निया येथे ‘डिस्नेलँड’ सुरू केले.
मुंबई ते रेवस अशी जलवाहतुक करणार्या ‘रामदास’ या फेरीबोटीला गटारी अमावस्येच्या रात्री ‘काशाचा खडक’ या ठिकाणाजवळ जलसमाधी मिळुन सुमारे ७०० लोक मृत्यूमुखी पडले.
किंग जॉर्ज (पाचवा) यांनी फतवा काढून जाहीर केले की त्यांच्या वंशातील पुरुष मंडळी ‘विंडसर’ हे आडनाव लावतील.
अतिशय गाजलेल्या ‘पंच’ या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
‘अॅडॅम्स-ओनिस’ करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
अँजेला मेर्केल – जर्मनीच्या चॅन्सेलर
बाबुराव बागूल – दलित साहित्यिक
(मृत्यू: २६ मार्च २००८)
स्नेहल भाटकर – संगीतकार
(मृत्यू: २९ मे २००७)
अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील
(मृत्यू: ११ मार्च १९७०)
मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य
(जन्म: २४ जून १९२८)
शांता हुबळीकर – प्रभातच्या ‘माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री, पुणे महापालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’
(जन्म: १४ एप्रिल १९१४)
काननदेवी – बंगाली व हिंदी चित्रपटातील अभिनेत्री व गायिका [१९३० ते १९५०]
(जन्म: २२ एप्रिल १९१६)
अॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता
(जन्म: ५ जून १७२३)