राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.
कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’ जाहीर
‘ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित केले.
इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.
खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
सोनू निगम – पार्श्वगायक
अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल
हेन्री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक
(मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती
(मृत्यू: १४ आक्टोबर १९१९)
एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका
(मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)
डॉ. विनायक महादेव तथा ‘वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक बरेच गाजले.
(जन्म: ६ जुलै १९२०)
शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ‘बालभारती’चे संपादक. त्यांचे ‘चोरा मी वंदिले’, ‘सागराचे पाणी’, ‘सवाल’, ‘बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ‘सरपंच’, ‘इशारा’, ‘घुंगरू’, ‘कुलवंती’, ‘बेईमान’, ‘ललाट रेषा’, ‘सुन माझी सावित्री’ या कादंबर्या हे गाजलेले साहित्य आहे.
(जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
‘कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ३१ मार्च १८७१)
ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर
(जन्म: १ एप्रिल १८१५)