ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी निवड.
अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
इराकने कुवेतवर आक्रमण केले. सुमारे ७ महिन्यांनंतर पराभव अटळ दिसू लागल्यावर युद्धातून माघार घेताना इराकचा सत्ताधीश सद्दाम हुसेन याने कुवेतमधील सुमारे ६०० तेलविहिरींना आगी लावल्या. या आगींमुळे वातावरणात भयानक काळा धूर पसरला. या धुरामुळे काही काळाने काश्मीरमधे काळ्या रंगाचे बर्फ पडले! सुमारे १०,००० लोक या आगी विझवण्याच्या कामात होते. अखेर या आगी पूर्णपणे विझवायला १० महिने लागले!
(Image Credit: Wikipedia)
नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व डॉ. मेबल आरोळे यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष बनले. हे अतिशय मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध होते.
अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.
शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.
अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक
ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ
जशन पहलाजराय वासवानी तथा दादा जे. पी. वासवानी – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य
(मृत्यू: १२ जुलै २०१८)
पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक
(मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८)
पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार
(मृत्यू: ४ जुलै १९६३)
आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ‘बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस
नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ‘मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत.
(मृत्यू: १६ जून १९४४)
एलीशा ग्रे – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक
(मृत्यू: २१ जानेवारी १९०१)
जॉन टिंडाल – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)
पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २ आक्टोबर १८४७)
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश-अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक
(जन्म: ३ मार्च १८४७)
सखारामबापू बोकील – पेशवाईतील मुत्सद्दी, साडेनीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
(जन्म: ? ? ????)
हेन्री (तिसरा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १९ सप्टेंबर १५५१)