-: दिनविशेष :-

८ सप्टेंबर

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

International Literacy Day

आपल्या लोकांना सर्वप्रथम ‘अंगठाछाप’ कोणी बनवले असेल?
तर ते पश्चिम बंगालमधील हुगळीचे कलेक्टर असणार्‍या सर विल्यम जेम्स हर्शेल यांनी. पुर्वी लोक अनेक व्यवहार करताना स्वाक्षरी करुनही नंतर ती नाकबूल करत असत. पण प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगवेगळे असल्याचे माहित असल्याने सर हर्शेल यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरीऐवजी अंगठ्याचे ठसे घेण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या घटना:

२००१

लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी यांची सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड

२०००

सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.

१९९१

मॅसेडोनियाला (युगोस्लाव्हियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६६

स्टार ट्रेक

‘स्टार ट्रेक’ या अतिशय गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिकेचे प्रसारण सुरू झाले.

(Image Credit: IMDb)

१९६२

नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९५४

साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना

१९४१

दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला. लेनिनग्राडची पूर्ण घेराबंदी करणारा हा वेढा २ वर्षे, ४ महिने, २ आठवडे आणि ५ दिवस टिकला. पुढे जर्मन सैन्याची सर्वत्र पीछेहाट व्हायला लागल्यावर २७ जानेवारी १९४४ रोजी तो काढण्यात आला. यात शहरातील अनेक लोक उपासमारीने मेले.

१८५७

ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांचा मुलगा सीताराम रंगो यांच्यासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी देण्यात आले.

१८३१

विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३३

आशा भोसले

आशा भोसले – गेली सत्तर वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्‍या प्रसिद्ध पार्श्वगायिका. त्यांनी विविध भाषांत ११,००० हुन अधिक गाणी गायली आहेत.

(Image Credit: The Indian Express)

१९२६

भूपेन हजारिका
२०१३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

भूपेन हजारिका – संगीतकार, गीतकार, गायक, कवी, चित्रपट निर्माते. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाबद्दल राष्ट्रीय पारितोषिक (१९७५), संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९८७), पद्मश्री (९१८७), दादासाहेब फाळके पारितोषिक (१९९२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२००८), पद्मविभूषण (२०१२ - मरणोत्तर), भारतरत्न (२०१७ - मरणोत्तर). भारतीय जनता पक्षाचे नेते.
(मृत्यू: ५ नोव्हेंबर २०११)

(Image Credit: Wikipedia)

१९२५

पीटर सेलर्स
१९७६ मधील छायाचित्र

पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक
(मृत्यू: २४ जुलै १९८०)

(Image Credit: Wikipedia)

१८८७

स्वामी शिवानंद सरस्वती

स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू
(मृत्यू: १४ जुलै १९६३)

(Image Credit: Wikipedia)

१८४८

व्हिक्टर मेयर

व्हिक्टर मेयर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ. वाफेची घनता निश्चित करण्यासाठी त्यांनी एक उपकरण (Viktor Meyer Apparatus) तयार केले.
(मृत्यू: ८ ऑगस्ट १८९७)

(Image Credit: Wikipedia)

११५७

रिचर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ६ एप्रिल ११९९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१९

राम जेठमलानी

राम जेठमलानी – केन्द्रीय कायदामंत्री, कायदेपंडीत व निष्णात वकील, दोन वेळा लोकसभा खासदार (वायव्य मुंबई), पाच वेळा राज्यसभा खासदार, वयाच्या १७ व्या वर्षीच ते एल. एल. बी. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
(जन्म: १४ सप्टेंबर १९२३ - शिकारपूर, पाकिस्तान)

(Image Credit: nocorruption.in)

२०१०

मुरली – तामिळ अभिनेता
(जन्म: १९ मे १९६४)

१९९७

कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ
(जन्म: १८ जून १९११)

१९९१

वा. रा. कांत

वामन रामराव तथा ‘वा. रा.’ कांत – भावकवी. त्यांची ‘सखी शेजारिणी तू हसत रहा’, ‘त्या तरुतळी विसरले गीत’, ‘बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ इ. भावगीते लोकप्रिय आहेत. १९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे ‘वेलांटी’, ‘पहाटतारा’, ‘शततारका’, ‘रुद्रवीणा’, ‘दोनुली’, ‘मरणगंध’ इ. काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले.
(जन्म: ६ आक्टोबर १९१३ - नांदेड)

(Image Credit: Internet)

१९८२

शेख अब्दुल्ला
१९८८ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

शेख मुहम्मद अब्दुल्ला – ‘शेर - ए - कश्मीर’ भारतात विलीन झाल्यानंतरचे जम्मू काश्मीरचे पहिले निर्वाचित पंतप्रधान (कार्यकाल: ९ मार्च १९४८ ते ९ ऑगस्ट १९५३), जम्मू काश्मीरचे तिसरे मुख्यमंत्री (कार्यकाल: २५ फेब्रुवारी १९७५ ते २६ मार्च १९७७ आणि ९ जुलै १९७७ ते ८ सप्टेंबर १९८२)
(जन्म: ५ डिसेंबर १९०५)

(Image Credit: Wikipedia)

१९८१

निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी
(जन्म: १७ एप्रिल १८९७)

१९६०

फिरोझ गांधी

फिरोझ जहांगीर घंडी तथा फिरोझ गांधी – १९५० ते १९५२ मधील हंगामी संसद सदस्य,पहिल्या (प्रतापगढ, उत्तर प्रदेश) व दुसऱ्या (रायबरेली, उत्तर प्रदेश) लोकसभेतील खासदार, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी, द नॅशनल हेराल्ड आणि द नवजीवन या वृत्तपत्रांचे संपादक
(जन्म: १२ सप्टेंबर १९१२)

(Image Credit: Wikipedia)

७०१

पोप सर्गिअस (पहिला) –
(जन्म: १५ डिसेंबर ६८७)Pageviews

This page was last modified on 12 September 2021 at 8:19pm