भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
(मृत्यू: २७ जुलै २०२१)
दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार
(मृत्यू: १८ एप्रिल १९९९ - न्यूयॉर्क)
तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ‘स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत
(मृत्यू: १७ आक्टोबर १९०६ - टिहरी, उत्तराखंड)
(Image Credit: Wikipedia)
नादिर शहा – पर्शियाचा सम्राट
(मृत्यू: १९ जून १७४७)
जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा
(मृत्यू: ३१ जुलै १७५०)
अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती
(जन्म: ? ? ????)
ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक
(जन्म: ? ? ????)
अजित खान ऊर्फ ‘अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक
(जन्म: २७ जानेवारी १९२२)
नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते
(जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू
(जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)