-: दिनविशेष :-

२५ आक्टोबर


महत्त्वाच्या घटना:

२००९

बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

१९९९

दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.

१९९४

ए. एम. अहमदी

अझीझ मुशब्बर उर्फ ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
(कार्यकाल: २५ ऑक्टोबर १९९४ ते २४ मार्च १९९७)

(Image Credit: scroll.in)

१९६२

युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५१

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५

अपर्णा सेन
२०१७ मधील छायाचित्र

अपर्णा सेन – बंगाली अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका, पद्मश्री (१९८७)

(Image Credit: iffk.in)

१८८१

पाब्लो पिकासो
१९०८ मधील चित्र

पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार
(मृत्यू: ८ एप्रिल १९७३)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

जसपाल भट्टी

जसपाल भट्टी – छोट्या पडद्यावरील विनोदी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक, पद्मभूषण (२०१३)
(जन्म: ३ मार्च १९५५)

(Image Credit: IMDb)

२००९

चित्तरंजन कोल्हटकर

चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते
(जन्म: १५ जानेवारी १९२३)

(Image Credit: IMDb)

२००३

पांडुरंगशास्त्री आठवले

पांडुरंग वैजनाथ तथा पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ‘स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
(जन्म: १९ आक्टोबर १९२० - रोहा, रायगड)

(Image Credit: Swadhyay Online)

१९८०

अब्दूल हयी ऊर्फ ‘साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार
(जन्म: ८ मार्च १९२१)

१९५५

पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’, ‘ठुमक चलत रामचंद्र’, ‘चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ‘सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत.
(जन्म: २८ मे १९२१)

१६४७

इव्हानजेलिस्टा टॉरिसेली

इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक
(जन्म: १५ आक्टोबर १६०८)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 24 October 2021 at 11:38pm