-: दिनविशेष :-

१७ नोव्हेंबर

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

International Students’ Day

महत्त्वाच्या घटना:

१९९६

पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ‘नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड

१९९४

रशियाच्या ‘मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

१९९२

देवरुख येथील ‘मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड

१९९२

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ‘भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर

१९३३

अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

१९३२

तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ‘लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.

१८६९

भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

१८३१

ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८

रत्‍नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते

१९३२

शकुंतला महाजन तथा ‘बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. प्रभात फिल्म कंपनीचा ‘दहा वाजता’ (१९४२) हा त्यांचा पहिला सिनेमा. पुढे ‘प्रभात’च्या ‘रामशास्त्री प्रभुणे’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली. बालकलाकार म्हणून अभिनयात ठसा उमटविलेल्या शकुंतला यांनी पुढील काळात हिंदी आणि मराठीतील दिग्गज कलावंतांसोबत काम केले आणि अनेक भूमिका उत्कृष्टपणे वठवल्या. परदेस, कमल के फूल, शिकायत, भाग्यवान, बिंदिया, बचपन, बच्चों का खेल, मोती, पूजा, नन्हे मुन्हे, सपना अशा अनेक हिंदी सिनेमांतून त्यांची कारकीर्द बहरली. १९५० मध्ये ‘परदेस’ हा सिनेमा लागला. मधुबाला आणि बेबी शकुंतला यांच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळेही हा सिनेमा गाजला. हिंदीतील प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘बिराज बहू’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. गायक-कलाकार किशोरकुमार यांच्यासोबत फरेब, लहेरे या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. छत्रपती शिवाजी, सीता स्वयंवर, मोठी माणसं, श्रीकृष्ण दर्शन, मी दारू सोडली, अखेर जमलं, चिमणी पाखरे, मूठभर चणे, मालती माधव, संत बहिणाबाई, तोतयाचे बंड, तारामती या मराठी सिनेमातील भूमिका प्रामुख्याने गाजल्या. सिनेकारकीर्द बहरात असताना १९५४ मध्ये त्यांचा गडहिंग्लज येथील इनामदार घराण्यातील श्रीमंत बाबासाहेब नाडगौंडे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी सिनेमात काम करायचे बंद करून संसाराला वाहून घेतले. राज्य सरकाने त्यांचा १९९६ मध्ये विशेष सन्मान केला होता. कोल्हापूर भूषण, करवीरभूषण, कलाभूषण, जीवनगौरव हे पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले. प्रभात फिल्म कंपनीत बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर चमकलेल्या शकुंतला यांनी सहजसुंदर अभिनयाने आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. कारकीर्द बहरात असताना त्यांनी १९५४ मध्ये सिनेसृष्टीचा निरोप घेतला. मात्र, त्यांची प्रेक्षक आणि सिनेमाशी नाळ शेवटपर्यंत कायम राहिली. या अभिनेत्रीची मोहिनी शेवटपर्यंत प्रेक्षकांवर राहिली. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला.
(मृत्यू: १८ जानेवारी २०१५)

१९२५

रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता
(मृत्यू: २ आक्टोबर १९८५)

१७५५

लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म
(मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)

व्हेस्पासियन – रोमन सम्राट
(मृत्यू: २३ जून ७९)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
(जन्म: २३ जानेवारी १९२६)

१९६१

कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा
(जन्म: १० नोव्हेंबर १९०४)

१९३५

गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ‘सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक
(जन्म: २१ ऑगस्ट १८७१)

१९३१

हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
(जन्म: ६ डिसेंबर १८५३)

१९२८

भरा

भरा

‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी
(जन्म: २८ जानेवारी १८६५)



Pageviews

This page was last modified on 18 August 2021 at 2:36pm