एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात ‘१९८७ - ए’ या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.
मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.
कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.
ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
नाझी पार्टीची स्थापना झाली.
इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले.
राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म
जे. जयललिता – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, एआयएडीएमके या राजकीय पक्षाच्या नेत्या, प्रसिद्ध अभिनेत्री
(मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)
जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
(मृत्यू: ९ मार्च २०१२)
तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा
(मृत्यू: ९ मे १९९८ - मुंबई,
महाराष्ट्र)
(Image Credit: talatmahmood.net)
राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, शिवाजी महाराजांचे चिरंजीव
(मृत्यू: २ मार्च १७००)
अनंत पै ऊर्फ ‘अंकल पै’ – ‘अमर चित्र कथा’ चे जनक
(जन्म: १७ सप्टेंबर १९२९)
ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या
(जन्म: १८ एप्रिल १९१६)
रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका
(जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)
निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष
(जन्म: ३० मार्च १८९५)
लक्ष्मीबाई टिळक – ‘स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले आहे.
(जन्म: ? ? १८६८)
रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला.
(जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ - लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)
हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि अरगॉन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, पृथ्वीची घनता मोजणारा पहिला शास्त्रज्ञ
(जन्म: १० आक्टोबर १७३१)
(Image Credit: Alchetron)
कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.
(जन्म: ? ? ????)