सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.
मरीनर - ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना
दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
हृषिकेश कानिटकर – क्रिकेटपटू
अॅडॅम गिलख्रिस्ट – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज
हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे
(मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)
ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली – संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस
अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, ‘दैनिक मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग
(मृत्यू: २६ आक्टोबर १९९१)
रघुवीर मूळगावकर – चित्रकार
(मृत्यू: ३० मार्च १९७६)
हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: २२ जुलै १९९५)
बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष
(मृत्यू: १० एप्रिल १९४९
- पुणे)
पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न [१९५५]. दर वर्षी या दिवशी नेहरू पुरस्कार देण्यात येतात.
(मृत्यू: २७ मे १९६४)
लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ‘बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ - बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला.
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ - न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक आणि जगप्रसिद्ध वूल्फगँग मोत्झार्टचे वडील
(मृत्यू: २८ मे १७८७)
विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ८ मार्च १७०२)
प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी
(जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर (Operation Flood) योजनेचे एक शिल्पकार
(जन्म: २७ एप्रिल १९२०)
अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक
(जन्म: १ सप्टेंबर १८९६)
नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ‘सुखाचा मूलमंत्र’, ‘पहाटेपुर्वीचा काळोख’, ‘उमज पडेल तर’, ‘एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्या होत. ‘कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता.
(जन्म: ११ जुलै १८८९ - समडोळी, जिल्हा सांगली)
कोट्टारी कनकय्या तथा सी. के. नायडू – क्रिकेटपटू, भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले कप्तान, पद्मभूषण (१९५६)
(जन्म: ३१ आक्टोबर १८९५)
(Image Credit: Wikipedia)
बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ
(जन्म: ५ एप्रिल १८५६)