-: दिनविशेष :-

५ एप्रिल

राष्ट्रीय नौकानयन दिन

राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन


महत्त्वाच्या घटना:

२०००

अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.

१९५७

कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.

१९५५

प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

१९४९

भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली.

१९३०

२४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.

१६७९

राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]

१६६३

दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ‘जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२०

डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य
(मृत्यू: ९ जुलै २००५)

१९२०

आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार
(मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)

१९१६

ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता
(मृत्यू: १२ जून २००३)

१९०९

अल्बर्ट आर. ब्रोकोली – ‘जेम्स बाँड’ पटांचे निर्माते
(मृत्यू: २७ जून १९९६)

१९०८

‘बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान
(मृत्यू: ६ जुलै १९८६)

१८५६

बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ
(मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)

१८२७

सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद
(मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक
(जन्म: ? ? १९४६)

१९९८

रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री
(जन्म: ? ? ????)

१९९६

भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक
(जन्म: ? ? ????)

१९९३

दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
(जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)

१९६४

गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार
(जन्म: ? ? ????)

१९४०

चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
(जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)

१९२२

पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ‘आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित
(जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९१७

शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर
(जन्म: ? ? ????)



Pageviews

This page was last modified on 28 May 2021 at 10:26am