-: दिनविशेष :-

१२ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

१९९३

एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१५०२

लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४९

गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज

१९३९

चौधरी अजित सिंग
२०१२ मधील छायाचित्र

चौधरी अजित सिंग – केंद्रीय मंत्री, १५ व्या लोकसभेतील खासदार (मथुरा), राष्ट्रीय लोकदल या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष, पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे चिरंजीव
(मृत्यू: ६ मे २०२१)

(Image Credit: विकिपीडिया)

१९२०

प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ‘प्राण’ – चित्रपट अभिनेता
(मृत्यू: १२ जुलै २०१३)

१८८१

अ‍ॅना पाव्हलोव्हा – ‘द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना
(मृत्यू: २३ जानेवारी १९३१)

१८७६

थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा
(मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)

१८७१

चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
(मृत्यू: ५ एप्रिल १९४०)

१८२४

स्वामी दयानंद सरस्वती

मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक
(मृत्यू: ३१ आक्टोबर १८८३ - अजमेर, राजस्थान)

(Image Credit: Wikipedia)

१८०९

चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: १९ एप्रिल १८८२)

१८०९

अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १५ एप्रिल १८६५)

१८०४

हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज
(मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)

१७४२

बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. यातील आजारपणातच त्यांचा अंत झाला. वाई जवळील मेणवली येथे नाना फडणीसांचा वाडा आजही पहायला मिळतो.
(मृत्यू: १३ मार्च १८००)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

भक्ती बर्वे
दिग्दर्शक पु. ल. देशपांडे, सतीश दुभाषी, अरविंद देशपांडे यांच्या समवेत ‘ती फुलराणी’ नाटकाची तालीम करताना

भक्ती बर्वे - इनामदार – रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक स्वच्छंद अभिनेत्री. सुधा करमरकर यांच्या ‘लिटिल थिएटर’ मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. वाई येथून ‘पु. लं., फुलराणी आणि मी’ हा एकपात्री प्रयोग करून मुंबईला परत जात असताना त्यांची कार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भाटण बोगद्याच्या सुरुवातीला धडकली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
(जन्म: १० सप्टेंबर १९४८ - सांगली)

(Image Credit:  @FilmHistoryPic)

२०००

विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते
(जन्म: ? ? ????)

१९९८

पद्मा गोळे – कवयित्री
(जन्म: १० जुलै १९१३)

१८०४

एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता
(जन्म: २२ एप्रिल १७२४)

१७९४

पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन
(जन्म: ? ? १७३०)Pageviews

This page was last modified on 31 October 2021 at 12:05am