उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
पुणे विद्यापीठाची स्थापना
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
राजेश पायलट – केंद्रीय मंत्री
(मृत्यू: ११ जून २०००)
दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ
(मृत्यू: ७ मे २००२)
हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
जगन्नाथ ऊर्फ ‘नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ
(मृत्यू: ३१ जुलै १८६५)
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: १५ जुलै १९०४)
नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक
(जन्म: १५ जुलै १९३२)
विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २७ मार्च १८४५)
सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद
(जन्म: ५ एप्रिल १८२७)
हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १२ फेब्रुवारी १८०४)