-: दिनविशेष :-

१३ मार्च


महत्त्वाच्या घटना:

२००७

वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

१९९९

जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्‍या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन

१९९७

मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.

१९४०

अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

१९३०

क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.

१९१०

पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

१७८१

विल्यम हर्षेल याने युरेनस या ग्रहाचा शोध लावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२६

रविन्द्र पिंगे

रविन्द्र पिंगे – ललित लेखक
(मृत्यू: १७ आक्टोबर २००८)

(Image Credit: मैत्री २०१२)

१८९३

डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक
(मृत्यू: ३ एप्रिल १९८५)

१७३३

जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४

उस्ताद विलायत खाँ – सतारवादक
(जन्म: २८ ऑगस्ट १९२८)

१९९७

शीला इराणी – राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू व संघटक
(जन्म: ? ? ????)

१९९६

शफी इनामदार

शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते
(जन्म: २३ आक्टोबर १९४५ - पांगारी, दापोली, रत्नागिरी)

(Image Credit: IMDb)

१९९४

श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व ‘सिटू’ या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते
(जन्म: ? ? ????)

१९६७

सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू
(जन्म: १ ऑगस्ट १९२४)

१९५५

वीर विक्रम शाह ‘त्रिभुवन’ – नेपाळचे राजे
(जन्म: २३ जून १९०६)

१९०१

बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २० ऑगस्ट १८३३)

१८९९

दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ‘कवी दत्त’
(जन्म: २७ जून १८७५)

१८००

बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. यातील आजारपणातच त्यांचा अंत झाला. वाई जवळील मेणवली येथे नाना फडणीसांचा वाडा आजही पहायला मिळतो.
(जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ - सातारा)Pageviews

This page was last modified on 22 October 2021 at 10:14am