सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.
इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
कोलोरॅडॊ अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.
जोसेफ प्रिस्टले व कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.
ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू
अरुणलाल – क्रिकेटपटू व समालोचक
यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू
महजबीन बानो ऊर्फ ‘मीनाकुमारी‘ – अभिनेत्री
(मृत्यू: ३१ मार्च १९७२)
सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
(मृत्यू: १३ मार्च १९६७)
‘लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक
(मृत्यू: १८ जुलै १९६९)
श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष
(मृत्यू: ? ? ????)
भगवान आबाजी पालव ऊर्फ ‘मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
(मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष
(मृत्यू: १ जुलै १९६२)
अच्युत बळवंत (वामन) कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, चतुरस्त्र लेखक, पत्रकार व नाटककार, चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी सुरु केला. ‘संदेश’ वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक
(मृत्यू: १५ जून १९३१)
जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ
(मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)
क्लॉडियस – रोमन सम्राट
(मृत्यू: ख्रिस्त पूर्व ५६)
हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य
(जन्म: २३ मार्च १९१६)
फहाद – सौदी अरेबियाचा राजा
(जन्म: १६ मार्च १९२१)
निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ‘अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या.
(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ - किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार
(जन्म: २३ जुलै १८५६ - रत्नागिरी)
लुई (सहावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १ डिसेंबर १०८१)