मक्केपासून सहा किमी अंतरावरील मिना (सौदी अरेबिया) येथे हज यात्रेकरुंच्या तंबूला आग लागून किमान ३०० जण मृत्युमुखी पडले.
अल्बर्ट ट्रॅव्हल कंपनीने लंडन ते कोलकाता (कलकत्ता) अशी बस सेवा सुरु केली. ५ जुलै रोजी ही बस कोलकात्याला पोचली. इंग्लंडहून निघाल्यावर बेल्जीयम, पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, युगोस्लाव्हिया, बल्गेरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान या मार्गे ही बस भारतात येत असे आणि दिल्ली, आग्रा, अलाहाबाद, वाराणसी मार्गे कोलकात्याला पोचत असे. १९७६ पर्यंत ही सेवा सुरु होती.
(Image Credit: Fox Photos/Hulton Archive/Getty Images)
दुसरे महायुद्ध – नाझी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या नॉर्वेतील नॉर्विक शहरावर दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी हल्ला सुरू केला.
जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.
मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली.
सुरेश भट – कवी
(मृत्यू: १४ मार्च २००३)
हसरत जयपुरी – गीतकार
(मृत्यू: १७ सप्टेंबर १९९९)
मल्हार सदाशिव तथा ‘बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक
(मृत्यू: १३ जानेवारी १९९७)
किम सुंग (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जुलै १९९४)
निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनच्या मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष
(मृत्यू: ११ सप्टेंबर १९७१)
(Image Credit: BBC: On This Day)
नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
(मृत्यू: २१ डिसेंबर १९७९)
चार्ल्स विल्सन पील – अमेरिकन चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १८२७)
लिओनार्ड ऑयलर – स्विस गणितज्ञ
(मृत्यू: १८ सप्टेंबर १७८३)
गुरू नानक देव – शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू
(मृत्यू: २२ सप्टेंबर १५३९)
(Image Credit: mPanchang)
लिओनार्डो डा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: २ मे १५१९)
वि. रा. करंदीकर – संत साहित्याचे अभ्यासक
(जन्म: २७ ऑगस्ट १९१९)
पॉल पॉट – कंबोडियातील २० लाख नागरिकांच्या हत्याकांडास जबाबदार असणारा ‘ख्मेर रुज’चा नेता
(जन्म: १९ मे १९२५)
पंडित लीलाधर जोशी – तत्कालीन मध्यभारत राज्याचे पहिले मुख्यमंत्री
(जन्म: ? ? ????)
ग्रेटा लोविसा गुस्ताव्हसन ऊर्फ ‘ग्रेटा गार्बो’ – हॉलिवूड अभिनेत्री
(जन्म: १८ सप्टेंबर १९०५)
जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: २१ जून १९०५)
एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान
(जन्म: २७ जानेवारी १८५०)
अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ याने हत्या केली.
(जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)
मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ ‘मोरोपंत’ – पंडीतकवी [चैत्र शु. १५]
(जन्म: ? ? १७२९)