रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा‘ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
गोविंदा – हिन्दी चित्रपट कलाकार
कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)
ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
हू जिंताओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष
पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस
(मृत्य़ू: १४ जून २००७)
भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
(मृत्य़ू: २ नोव्हेंबर १९९०)
बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्य़ू: १९ एप्रिल १८८१)
निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ‘पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
(जन्म: ४ जुलै १९१४)
पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक
(जन्म: ? ? ????)
मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार
(जन्म: ? ? ????)
नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
(जन्म: १५ एप्रिल १८९३)
सर जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
(जन्म: १६ डिसेंबर १८८२)
(Image Credit: National Portrait Gallery, England)
जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ
(जन्म: ११ एप्रिल १७५५)