‘स्वर्गदारा’तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे ‘कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले.
जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
‘फॉक्स मॉथ’ विमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
पोर्तुगीज सरदार अफोन्सो डी अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: ५ एप्रिल १९९३)
डॅनी डेंग्झोप्पा – चित्रपट अभिनेते
जॉर्ज हॅरिसन– ‘बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक
(मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)
अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते.
(मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ - मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार. मुलांसाठी ‘बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
(मृत्यू: ९ आक्टोबर १९१४)
(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)
सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला.
(जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १९ एप्रिल १९१२)
गिरजाबाई महादेव केळकर – लेखिका व नाटककार
(जन्म: ? ? ????)
डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक
(जन्म: २९ जून १८९१)
शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री (कुंकू, दुनिया ना माने, अमृत मंथन इ.)
(जन्म: २३ नोव्हेंबर १९१६)
जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव ‘एस. पी. कॉलेज‘ असे करण्यात आले.
(जन्म: ? ? ????)
संत एकनाथ
(जन्म: ? ? १५३३)