संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर
रशियाच्या ‘मीर’ या अंतराळस्थानकामधे आग लागली.
कोकण रेल्वेच्या चिपळूण - खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ
सीरियात लष्करी उठाव झाला.
संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी (EPF) विधेयक मंजूर केले.
आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना
दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई - अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
(Image Credit: NBC News)
दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.
दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.
डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.
चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक ‘गटेनबर्ग बायबल’ प्रकाशित झाले.
अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर
(मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)
येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
(मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)
गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ ‘विवेक’ – मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले अभिनेते
(मृत्यू: ९ जून १९८८)
प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
(मृत्यू: ६ जानेवारी १९७१)
सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक
(मृत्यू: २६ मे १७०३)
राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ‘हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
(जन्म: २० डिसेंबर १९४२)
(Image Credit: Dawn)
सिकंदर बख्त – परराष्ट्रमंत्री, केरळचे राज्यपाल व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते (भाजप)
(जन्म: २४ ऑगस्ट १९१८)
विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: २२ जानेवारी १९३४)
वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे – वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
रमण लांबा – क्रिकेटपटू
(जन्म: २ जानेवारी १९६०)
मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – चित्रपट अभिनेत्री
(जन्म: १४ फेब्रुवारी १९३३ - नवी दिल्ली)
लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ‘बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते.
(जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ - घेन्ट, बेल्जिअम)
महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ‘इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी
१८६८ मधे ‘जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले.
(जन्म: २ नोव्हेंबर १८३३ - पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)
कार्ल फ्रेड्रिक गाऊस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ, आर्किमिडीज व न्यूटन यांच्या तोडीचे गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स व नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास होता.
(जन्म: ३० एप्रिल १७७७)