गुजराथमधे शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याचा अधिकार आहे; असा निर्णय घेतल्याची माहिती गुजराथच्या शिक्षण राज्यमंत्री श्रीमती आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत दिली.
भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली (कार्यकाल: २५ जुलै १९९२ ते २४ जुलै १९९७). तत्पुर्वी ते उपराष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
चंद्रावर पहिला मानव उतरवणार्या ‘अपोलो-११’ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथुन प्रक्षेपण
ईटली व फ्रान्सला जोडणार्या माँट ब्लँक बोगद्याचे उद्घाटन झाले.
अमेरिकेने तयार केलेल्या अणूबॉम्बची न्यू मेक्सिकोमधील लास अलमॉस येथील वाळवंटात चाचणी
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडरची या दिवसापासुन सुरूवात झाली.
कतरिना कैफ – चित्रपट कलाकार
शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू
धनराज पिल्ले – हॉकी पटू
प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक
(मृत्यू: ६ जानेवारी २०१०)
जनरल कोटिकालापुडी वेंकटा कृष्णराव तथा के. व्ही. कृष्णराव – भारताचे ११ वे भूदल प्रमुख (महार रेजिमेंट) [कार्यकाल: १ जून १९८१ ते ३१ जुलै १९८३], परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित, जम्मू काश्मीर, नागालँड, मणिपूर व त्रिपूराचे राज्यपाल
(मृत्यू:
३० जानेवारी २०१६)
जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक
(मृत्यू: १४ मे १९७८)
वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
(मृत्यू: ३० नोव्हेंबर १९९५)
स्वामी शांतानंद सरस्वती– ज्योतिर्मठाचे शंकराचार्य
(मृत्यू: ७ डिसेंबर १९९७ - अलाहाबाद, उत्तर प्रदेश)
अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर)
इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(मृत्यू: २९ जुलै १९९६)
सर जोशुआ रेनॉल्ड्स – ब्रिटिश चित्रकार व रॉयल अॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष, व्यक्तिचित्रे काढण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती.
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १७९२ - लंडन, इंग्लंड)
उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (१९७०), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे
गुरू
(जन्म: ? ? १९०९)
वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार
(जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
चार्ल्स (पहिला) – हंगेरीचा राजा
(जन्म: ? ? १२८८)