पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ‘एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा
बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
कलकत्ता येथे ‘आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना
हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०
कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ‘बाकीबाब’ – कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार
(मृत्यू: ९ जुलै १९८४)
विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: २४ जानेवारी १९६५)
जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)
(Image Credit: Bose Institute)
मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार
(मृत्यू: २१ एप्रिल १९१०)
स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13)
असे नाव दिले आहे.
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)
ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक
(मृत्यू: २१ मे १६८६)
इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
(जन्म: ४ डिसेंबर १९१९)
राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
(जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)
वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: १६ जुलै १९१४)
निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर
(जन्म: १४ जानेवारी १८८३)
ऑस्कर वाईल्ड – आयरिश कवी व नाटककार, ‘कलेसाठी कला’ या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत ‘दूरचे दिवे’ हे नाटक ‘अॅन आयडियल हजबंड’चे रुपांतर आहे. १९६३ मध्ये त्यांचे साहित्य ‘द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड’ या नावाने संकलित झाले आहे.
(जन्म: १६ आक्टोबर १८५४)
(Image Credit: Britannica)