-: दिनविशेष :-

२७ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

१९९५

पाँडेचरीमधील ‘व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ‘थ्रॉम्बिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. हा एक रक्ताच्या गुठळ्या विरघळवणारा अभिकारक आहे. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.

१९९५

गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

१९४४

दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.

१८३९

बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे ‘अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन‘ची स्थापना

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८६

सुरेश रैना

सुरेश रैना – क्रिकेटपटू

(Image Credit: The Telegraph)

१९४०

ब्रूस ली
१९७० मधील छायाचित्र

ब्रूस ली – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ
(मृत्यू: २० जुलै १९७३)

(Image Credit: The Hollywood Reporter)

१९१५

दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीचा ‘घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे.
(मृत्यू: २९ जून १९८१)

१९०७

हरिवंशराय बच्‍चन
२००३ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी
(मृत्यू: १८ जानेवारी २००३)

(Image Credit: Wikipedia)

१८८१

डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ
(मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)

१८७४

चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)

१८७०

रावबहादूर दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस – इतिहास संशोधक
(मृत्यू: ३१ मार्च १९२६)

१८५७

सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ
(मृत्यू: ४ मार्च १९५२ - इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१६

आनंद यादव

आनंद यादव – लेखक
(जन्म: ३० नोव्हेंबर १९३५)

(Image Credit: Library Mantra)

२००८

विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे
(जन्म: २५ जून १९३१)

२०००

बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर – साहित्यिक, संशोधक, ‘दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक
(जन्म: २६ मार्च १९०९)

१९९४

दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि ‘रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
(जन्म: २८ मे १९०७ - महाड, रायगड)

१९७८

लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका
(जन्म: ६ जुलै १९०५)

१९७६

गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
(जन्म: २८ डिसेंबर १८९९)

१९५२

शंकर रामचंद्र तथा ‘अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार
(जन्म: २३ आक्टोबर १८७९)

१७५४

अब्राहम डी. मुआव्हर – फ्रेन्च गणिती
(जन्म: २६ मे १६६७)



Pageviews

This page was last modified on 29 November 2021 at 9:35pm