मार्स या युध्ददेवतेवरुन या महिन्याला मार्च असे नाव आहे. एके काळी मार्च हा रोमन दिनदर्शिकेत पहिला महिना होता. त्यामुळे इ. स. पू. ७१२ पर्यंत १ मार्च हा दिवस नववर्षदिन म्हणून साजरा केला जात असे.
पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.
दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बोस्निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.
प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता. तो दिवसासुद्धा १५० किलोमीटर पेक्षा जास्त दूरवर दिसला. या स्फोटामुळे आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झाला.
गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना
आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
क्लेमंट अॅटली यांच्या सरकारने ‘बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण केले. यानंतर १९९७ मध्ये या बँकेला परत स्वायत्तता देण्यात आली.
अमेरिकेतील महाकाय ‘हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.
रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.
‘टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना
‘यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची अमेरिकेत स्थापना झाली.
ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले.
रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.
शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू
सलील अंकोला – क्रिकेटपटू
युसुफखान महंमदखान तथा डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक. लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. भाषाविज्ञान व सांस्कृतिक अध्ययन संशोधन या क्षेत्रांतही डॉ. पठाण यांनी कार्य केले आहे.
राम प्रसाद गोएंका – उद्योगपती
(मृत्यू: १४ एप्रिल २०१३)
यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)
गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री
(जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)
दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित
(जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)
निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली
(जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)
वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ
(जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
नारायण सदाशिव मराठे तथा ‘केवलानंद सरस्वती‘ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक
(जन्म: ८ डिसेंबर १८७७)