-: दिनविशेष :-

२६ फेब्रुवारी

राष्ट्रीय महिला आरोग्य दिन

कुवेतचा मुक्तीदिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

आंतरराष्ट्रीय जनुक अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान केंद्रातील (ICGEB) शास्त्रज्ञ प्रा. जी. पी. तलवार यांची मानाच्या समजल्या जाणार्‍या मास्त्रोनी-सीगल पुरस्कारासाठी निवड

१९९९

आशिया खंडातील पहिले? तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील ‘अभिरुची हॉटेल’ आगीत भस्मसात झाले.

१९९८

परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.

१९९५

बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक (Investment Bank) दिवाळखोरीत निघाली.

१९८४

‘इन्सॅट-१-इ’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित

१९७६

वि. स. खांडेकर यांना (ययाती कादंबरीसाठी) मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान

१९२८

बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३७

मनमोहन देसाई – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
(मृत्यू: १ मार्च १९९४)

१९२२

मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता
(मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९०)

१८७४

सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ ‘कलापि’ – प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी, त्यांचा ‘कलापिनो केकारव’ हा काव्यसंग्रह खूप गाजला आहे.
(मृत्यू: ? ? १९००)

१८६६

हर्बर्ट डाऊ – अमेरिकन उद्योगपती
(मृत्यू: १५ आक्टोबर १९३०)

१८२९

लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९०२)

१८०२

व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक
(मृत्यू: २२ मे १८८५)

१६३०

गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू
(मृत्यू: ६ आक्टोबर १६६१)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१०

नानाजी देशमुख
२०१७ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ - १९९७), पद्मविभूषण (१९९९), भारतरत्न (२०१९). त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले.
(जन्म: ११ आक्टोबर १९१६ - कडोळी, हिंगोली, महाराष्ट्र)

(Image Credit: Wikipedia)

२००४

शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
(जन्म: १४ जुलै १९२०)

२००३

राम वाईरकर – व्यंगचित्रकार, महाराष्ट्रातल्या बालवाचकांना सुपरिचित असलेला फास्टर फेणे वाईरकर यांच्या कुंचल्यातून उतरला होता.
(जन्म: ? ? ????)

२०००

बा. म. तथा ‘रावसाहेब’ गोगटे – बेळगाव येथील उद्योगपती
(जन्म: ? ? ????)

१९६६

महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन
(जन्म: २८ मे १८८३)

१९३७

एल. के. अनंतकृष्ण अय्यर – दक्षिण भारतातील जातिजमातींची सखोल पाहणी करुन माहिती गोळा करणारे मानववंशशास्त्रज्ञ
(जन्म: ६ जुलै १८६२)

१८८६

नर्मदाशंकर दवे ऊर्फ ‘नर्मद’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक, त्यांनी गुजराथी भाषेचा शब्दकोश सर्वप्रथम तयार केला.
(जन्म: २४ ऑगस्ट १८३३)

१८७७

थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
(जन्म: १३ डिसेंबर १८०४)Pageviews

This page was last modified on 10 October 2021 at 10:28pm