-: दिनविशेष :-

११ आक्टोबर

आंतरराष्ट्रीय कन्या दिवस

International Day of the Girl Child

महत्त्वाच्या घटना:

२००१

‘पोलरॉईड कार्पोरेशन’ने दिवाळखोरी जाहीर केली.

२००१

सर विद्याधर सूरजप्रकाश तथा व्ही. एस. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुमारे १० लाख डॉलर रकमेचे हे बक्षीस आहे.

१८५२

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’ ची स्थापना झाली. हे ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ आहे.

(Image Credit: University of Sydney)

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१

मुकूल आनंद

मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: ७ सप्टेंबर १९९७)

(Image Credit: IMDb)

१९४६

डॉ. विजय पांडुरंग भटकर

डॉ. विजय पांडुरंग भटकर – संगणकतज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू ‘सी. डॅक’ या प्रगत संगणकीय विकसन केन्द्राचे संस्थापक. ८ ग्रंथांचे लेखन-संपादन व सुमारे ७५ शोधनिबंध यांमुळे त्यांनी संगणकीय विज्ञान क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.

(Image Credit: Nalanda University)

१९४३

कीथ बॉईस
इंग्लंड विरुद्ध तिसरी कसोटी (लॉर्ड्स १९७३)

कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू
(मृत्यू: ११ आक्टोबर १९९६)

(Image Credit: ESPN CricInfo / Getty Images)

१९४२

अमिताभ बच्‍चन – चित्रपट अभिनेता व निर्माता

१९३२

सुरेश पुरुषोत्तमदास दलाल
२००६ मधील छायाचित्र

सुरेश पुरुषोत्तमदास दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार (२००५) विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक, बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: १० ऑगस्ट २०१२ - मुंबई)

(Image Credit: Wikipedia)

१९३०

बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ‘बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ‘आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक
(मृत्यू: ९ एप्रिल २००१)

(Image Credit: Alchetron)

१९१६

नानाजी देशमुख

चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख – समाजसुधारक व संघप्रचारक, लोकसभा व राज्यसभा सदस्य, डी. लिट. (पुणे विद्यापीठ - १९९७), पद्मविभूषण (१९९९), भारतरत्न (२०१९). त्यांनी रचनात्मक ग्रामीण विकासाला वेगळी दृष्टी दिली. डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम, ग्रामोदय विश्वविद्यालय, उदयमिता विद्यापीठ, आयुर्वेद विद्याप्रतिष्ठान, गोमाता संगोपन प्रकल्प अशा विविध संस्थांमार्फत विधायक कार्यक्रमांचे जाळे त्यांनी विकसित केले.
(मृत्यू: २६ फेब्रुवारी २०१० - सतना, मध्य प्रदेश)

(Image Credit: Alchetron)

१९१६

मीनाक्षी शिरोडकर
ब्रह्मचारी (१९३८)

रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ‘यमुनाजळी खेळू ...’ या गाण्यासाठी प्रसिद्ध
(मृत्यू: ३ जून १९९७)

(Image Credit: Wikipedia)

१९०२

जयप्रकाश नारायण
इस्राएलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांच्या समवेत
तेल अव्हिव्ह (१९५८)

‘लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान. रॅमन मॅगसेसे पारितोषिक (१९६५), भारतरत्न (१९९९ - मरणोत्तर)
(मृत्यू: ८ आक्टोबर १९७९ - पाटणा, बिहार)

(Image Credit: Wikipedia)

१८७६

चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ‘प्रवासी’, ‘मॉडर्न’, ‘रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
(मृत्यू: १७ डिसेंबर १९३८ - कलकत्ता)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२

दीना पाठक
संजीवकुमार बरोबर (सत्यकाम - १९६९)

दीना पाठक – अभिनेत्री, आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी १३० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.
(जन्म: ४ मार्च १९२२ - अमरेली, गुजरात)

(Image Credit:  Film History Pics)

१९९९

रमाकांत कवठेकर – ‘नागीण’, ‘आघात’, ‘पंढरीची वारी’ यांसारख्या पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक
(जन्म: ? ? ????)

१९९७

विपुल कांति साहा – आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे सदस्य
(जन्म: ? ? ????)

१९९६

कीथ बॉईस
प्रुडेन्शिअल ट्रॉफी (द ओव्हल - ७ सप्टेंबर १९७३)

कीथ बॉईस – वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू
(जन्म: ११ आक्टोबर १९४३)

(Image Credit: Getty Images)

१९९४

दिगंबर परशुराम तथा काकासाहेब दांडेकर – उद्योगपती, कॅम्लिन उद्योगसमुहाचे संस्थापक
(जन्म: ? ? ????)

१९८४

खंडू रांगणेकर

खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ‘खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज
(जन्म: २७ जून १९१७)

(Image Credit: CricHQ)

१९६८

तुकडोजी महाराज
१९९५ मध्ये जारी केलेले टपाल तिकीट

माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ‘राष्ट्रसंत’ असे संबोधले जाते. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
(जन्म: ३० एप्रिल १९०९)

(Image Credit: Wikipedia)

१८८९

जेम्स प्रेस्कॉट ज्यूल

जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक
(जन्म: २४ डिसेंबर १८१८)

(Image Credit: Wikipedia)



Pageviews

This page was last modified on 11 October 2021 at 2:57pm