बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.
गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष
शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
(मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)
सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९४)
गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.
(मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील
(मृत्यू: २ जानेवारी १९३५)
ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते
(मृत्यू: ३० जानेवारी १९४८)
लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता]
(जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
य. द. लोकुरकर – निर्भिड पत्रकार
(जन्म: ? ? ????)
उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार
(जन्म: २९ मार्च १९२९)
रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक
(जन्म: ? ? ????)
डॉ. विनायक विश्वनाथ तथा ‘अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संस्थापक
(जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ‘मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.
(जन्म: १९ जानेवारी १९०६)
बद्रुद्दिन तैय्यबजी – कायदेपंडित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३ रे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले प्रभारी मुख्य न्यायमूर्ती
(जन्म: १९ जानेवारी १९०६)
(Image Credit: @mumbaiheritage)
ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
(जन्म: १९ जून १६२३)