संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ‘भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.
दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना
मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
पुणे यथे ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ सुरू झाले.
लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ‘मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
रमण लांबा – क्रिकेटपटू
(मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)
किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि खासदार
हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष
(मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)
आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक
(मृत्यू: ६ एप्रिल १९९२)
वसंत रणछोडदास गोवारीकर – भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ, इस्रोचे संचालक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (१९९१-१९९३), पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (२००८), फाय फाउंडेशन पारितोषिक विजेते
(जन्म: २५ मार्च १९३३)
अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी
(जन्म: ? ? १९४७)
विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
(जन्म: ? ? ????)
सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
(जन्म: १२ एप्रिल १९५४)
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक
(जन्म: २३ एप्रिल १८७३)
हुतात्मा वीर भाई कोतवाल
(जन्म: ? ? ????)
मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील
(जन्म: १९ ऑगस्ट १८८६)
अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान
(जन्म: ? ? ????)